अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो
असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे.
तसेच
अन्याय होत असेल तर लाथा घाला असे स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना 22 सार्वजनिक सुट्ट्या (PH) लागू आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळ ठराव क्र. ८६०५ नुसार परक्राम्य संलेख अधिनियम १८८१ (सन १८८१ चा अधिनियम २६) कलम २५ अंतर्गत दरवर्षी शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या लागू असतील हे मान्य करून एसटी प्रशासन दरवर्षी डिसेंबर महिन्यात परिपत्रक काढते त्यानुसार जेवढे सार्वजनिक सुट्ट्या (PH) शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतात तेवढेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना लागू होतील, असे परिपत्रकात नमूद असते.
दरवर्षी सरासरी 22 सार्वजनिक सुट्ट्या (PH) याचा लाभ एसटी महामंडळातील मध्यवर्ती कार्यालय, विभागीय कार्यालय व प्रशिक्षण केंद्र कार्यालय यामधील कर्मचारी उपभोगतात...
परंतु,
आगार व कार्यशाळा येथील कर्मचारी यांना फक्त दरवर्षी 10 सार्वजनिक सुट्ट्या (PH) इतकाच लाभ देण्यात येतो.
कायद्यानुसार व परिपत्रकानुसार दरवर्षी 22 सार्वजनिक सुट्ट्या (PH) देण्याच्या सूचना असतानाही आगारातील व कार्यशाळेतील एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 10 PH देने म्हणजे हा त्यांच्यावरील अन्याय आहे.
हा अन्याय मागील अनेक वर्षांपासून चालू आहे पण आज या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी संघर्ष करणे आवश्यक आहे आणि आपल्या हक्काचे 22 PH मिळवून घेणे हा आपला अधिकार आहे.
त्यासाठी फक्त एक छोटेसे काम करावे लागेल.
प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभाग नियंत्रक यांना एक अर्ज करावा आणि त्या अर्जासोबत मागील दहा वर्षाचे परिपत्रके आणि मंजूर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जोडून द्यावी.
जे कर्मचारी निवेदन देतील त्यांना नक्की फायदा होईल व दरवर्षी 22 सुट्ट्या (PH) मिळतील.
फक्त एकच काम करायचे आहे.
अर्जाचा नमुना आणि परिपत्रके हे PDF स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल.
संघर्ष न्याय हक्कासाठी
जय संघर्ष
निवेदनाची प्रत आणि परिपत्रके खालील लिंक द्वारे डाउनलोड करा