🏇एस टी कामगारांनी घेतली २१ व्या शतका कडे धाव 🏇�
🇮🇳 ना पार्टी, ना पुढारी, फक्त संघर्ष तुतारी 🇮🇳
🎤फक्त व्हाटस्अप चा वापर करून मुम्बईत आझाद मैदान
वर संघर्षासाठी जमविले हजारो कामगार 🗣👤👥
१६/०३/२०१६ रोजी "एस टी शासनात विलीनीकरण " यासाठी चे एकदिवशीय लाक्षणीक उपोषण झाले ते पुर्णपुणे संघर्ष मित्रांनी दिलेली साथ,प्रत्येक,अप्रत्यक्षरित्या दिलेला पाठिंबामुळे यशस्वी झाले आहे. तसेच विविध संघटना, समिती तसेच महामंडळातील ठराविक संघटना यांनीपण पाठिंबा दिलेला आहे.
कदाचीत अशी पहिलीच वेळ असेल संघटनानी कामगारांना पाठिंबा दिला म्हणून.
👉 एसटी महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक(M.D.) श्री.अशोक गजभिये साहेब यांनी दिलेला पाठिंबा, विलीनीकरण विषयी दिलेले अनुमोदन संघर्ष मित्रांना खुप आशादायी होते.
कुठलेही संघटना किंवा रजिस्ट्शन नसतांनाही संघर्षच्या उपोषणाची कामगारमंत्री मेहता साहेबांनी दखल घेऊन संघर्ष मित्रांसोबत चर्चा करून तुमची मागणी रास्त असून अधिवेशन संपल्यावर मा.मुख्यमंत्री, परिवहनमंत्री,कामगारमंत्री व संघर्ष टिम यांच्या मिटींग घेण्याचे सांगितले आहे. तसेच
मुख्यमंत्री साहेबांचे प्रतिनिधी म्हणून आलेले मा.आ.योगेश सागर साहेब यांनीही लवकरात लवकर यावर मा.मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून मुद्दा निकाली काढू असे सांगितले आहे. हे सगळ कामगार एकजुटीमुळे शक्य झाले आहे.
महामंडळातील १९ संघटना ज्यावेळी कामगार आंदोलन केले. कधीही कोणत्या मंत्र्यांनी यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता प्रस्थापित संघटनानाही दरारून घाम फुटला आहे.
हे सगळे कामगारांच यश आहे.
येणार्या काळात कामगारांना आणि एस टी महामंडळाला संघर्ष मुळे निश्चीतच "अच्छे दिन" येतील.
ज्यांनी संघर्ष आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे आभार. ज्यांनी नाहि दिला त्यांनाही संघर्ष सोबत येण्यास भाग पाडू.
👉आपली विलीनीकरणाची मागणी पुर्ण होईपर्यत "पोस्ट कार्ड" मोहीम राबवावीच लागेल.
👊संघर्ष कामागारांचा एकच नारा. एसटी शासनात विलीन करा.👊